रावेर प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणार्या ७५ नागरिकांवर येथे प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
रावेर शहरात मास्क न घालणारे- ४८ तर सोशल डिस्टन्स न ठेवणारे- २७ अशा एकूण- ७५ इसमांवर दंडात्मक कारवाई करून एकूण-३९९००/- रुपये दंड आकारण्यात आला आहे. संबंधीत कारवाई डीवायएसपी पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ भागवत धांडे, हेकॉ जितेंद्र नारेकर यांनी केली आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढतच असून कोरोना ही महामारी आवाक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतः ची व दुसर्याची सुरक्षा ठेवणे करीता नियमांचे पालन करावे. मास्क लावावा,सोशल डिस्टन्स ठेवावे व विनाकारण फिरू नये. अन्यथा यापुढे आणखी कडक कारवाई करण्यात येईल. तसेच अंत्यविधी करीता फक्त १५ लोकांनी व लग्न समारंभास ५० पेक्ष्या जास्त जमू नये. पंगत सुद्धा सर्व नियमांचे पालन करूनच द्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. ज्यांनी नियमाचे पालन न केल्यास गुन्हे दाखल करून सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.