रावेर प्रतिनिधी । राज्य समन्वयक जमावबंदी आयुक्त पुणे यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आज रावेर तहसिलदार कार्यालयासमोर तलाठी संघटनेने एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी या आंदोलनाला कोतवाल व महसूल संघटनेने सुध्दा पाठिंबा दिला.
राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ आज तलाठी कोतवाल व महसूल संघटनेच्या वतीने आज एक दिवसीय निर्दशने करण्यात येत आहे.येथील तहसीलदार कार्यालयात आंदोलन सुरु आहे. यावेळी आंदोलनात मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, कौशल चौधरी, प्रविण पाटील, अध्यक्ष हनिफ तडवी, गुणवंत बारेला, अनंत खवले, मिना तडवी, सी. जी. पवार, जर्नादन बंगाळे, राजेंद्र शेलकर, शरद पाटील, गोपाल मगन, समीर तडवी, यासीन तडवी, प्रविण वानखेडे आदी तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी कोतवाल आंदोलनात सहभागी झाले होते.