रावेरात घरोघरी स्क्रिनिंग तपासणीसाठी आरोग्य प्रशासन सज्ज- मुख्याधिकारी रविंद्र लांडे (व्हिडीओ)

रावेर (शालिक महाजन)। शहरातील सर्व नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यासाठी नगरपालिकेचे पाच पथक तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात तीन सदस्य, एक थर्मामीटर, शरीरातील ऑक्सीजन मोजण्याचे उपकरण देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना दिली.

शहरातील कारोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे आत शहरातील प्रत्येक घरात जावून प्रत्येक सदस्यांची थर्मल तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यानुसार शहरातील तपासणी सर्वे करण्यासाठी पाच पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकाकडे ताप व ऑक्सीजन मोजण्याचे कीट देण्यात आले असून सदरील पथक रावेर शहरातील प्रत्येक घरी जावून तपासणी करणार आहे.

शहरातील प्रत्येक घरी जावून कुटुंब प्रमुखांची नावाची नोंद करण्यात येणार आहे. यावेळी घरातील वयोवृध्द, लहान मुले, बाहेरगावाहून आलेले सदस्यांची तपासणी होणार आहे. शरीराचे तापमान क्षमतेपेक्षा जास्त असेल तर त्यांची ऑक्सीजन चाचणी केली जाईल. तसेच ऑक्सीजन चाचणीतही काही दिसून आले तर अश्या नागरिकांना रावेर ग्रामीण रूग्णालयात एक्स-रे काढण्यात येणार आहे. एक्स-रे रिपोर्टमध्ये कोरोनाची काही लक्षणे आढळून आल्यास त्यास क्वारंटाईन करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसात तीन रूग्ण आढळून आले असून तिघांना ग्रामीण रूग्णालयात भरती केले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी आले असता त्यांना प्रत्येक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी केले आहे.

 

Protected Content