रावेर प्रतिनिधी । रावेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीवरील चालकाचा ताबा सुटून लिंबाच्या झाडाला धडक देऊन आयशर गाडी जळुन खाक झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.
याबाबत असे की, मध्यप्रदेश बुऱ्हाणपूरकडून रावेरच्या दिशेने रात्री दिडच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडी क्रमांक एमएच 04 एफजे 6668 वरील इरफान शाहद मिर (रा.खैराती बाजार) बुऱ्हानपुर या चालकाचा ताबा सूटल्याने कर्जोत (ता. रावेर) गावाच्या पुढे जंगली पीर रस्त्याच्या बाजुला असलेल्या निंबाचे झाडाला धडक देवुन वाहनास शॉट सर्कीट होऊन आग लागल्याने झालेल्या नुकसानीस वरील वाहन चालक जबाबदार असल्याने चालकाविरुध्द रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश चौधरी करीत आहे.