जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “आन्ट्रप्रनर्शिप, बिजनेस आयडिया अॅन्ड बिजनेस मॉडेल कॅनव्हास” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतच करण्यात आलं होत.
व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये कार्यरत असलेली “एआयसीटी” या अग्रगण्य संस्थेद्वारे भारतातील विविध तांत्रिक व व्यवस्थापकीय शिक्षण संस्थामध्ये उद्योकता विकास तसेच स्टार्टअपवर मागर्दर्शन करण्याकरिता विविध प्रकारचे आन्ट्रप्रनर्शिप डेव्हलपमेट क्लबची स्थापना कराव्यात अशा मार्गदर्शक सूचना एआयसीटीने केल्या असून या अनुषंगाने शहरातील जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात उद्योजकता विकास कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या डीन प्रा. ज्योती जाखेटे यांच्या संकल्पनेतून नुकताच “आन्ट्रप्रनर्शिप, बिजनेस आयडिया अॅन्ड बिजनेस मॉडेल कॅनव्हास” या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होत.
यावेळी डीन प्रा. ज्योती जाखेटे व प्रा. डॉ. मोनाली शर्मा यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आपल्या देशाच्या आर्थिक वाढीत फॅमिली बिजनेस मॅनेजमेंटचा नव्वद टक्के वाटा असून फॅमिली बिजनेसच्या वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तसेच आजच्या तरुण पिढीला नवटेक्नोलॉजीचे सर्वभूत ज्ञान असल्याने या तरुणाईने आग्रहाने आपल्या फॅमिली बिजनेसमध्ये अग्रेसर होऊन कार्यरत व्हायला हवे, म्हणजेच फॅमिली बिजनेसमधील पहिल्या पिढीचा अनुभव, त्यांची हुशारी व दुसऱ्या पिढीला असलेली टेक्नोलॉजीची ओळख त्यांना मिळालेले उच्च शिक्षण तसेच स्वातंत्र्य या दोघाच्या समन्वयाने फॅमिली बिजनेसची प्रगती हमखास शक्य आहे.
तसेच जळगावच्या एमडीसीतील तसेच इतर भागातील उद्योग हे नव्वद टक्के फॅमिली बिजनेस असून जळगावच्या तरुणांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायाकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी विध्यार्थ्यांना केले. यानंतर आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रा. ज्योती जाखेटे यांनी नमूद केले कि, अनेक मोठय़ा उद्योगांची-व्यवसायांची सुरुवात ही कौटुंबिक उद्योगापासूनच होते. आपल्या देशामध्ये अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती दिसतात. आज कौटुंबिक स्तरावर चालवले जाणारे अनेक व्यवसाय आपल्याला दिसतात.
या व्यवसायांचे स्वरूप सुरुवातीच्या काळामध्ये अर्थातच लहानसे असते; परंतु एखाद्या लहान व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी व्यवस्थापन कार्यक्षम असायला हवे. कोणताही व्यवसाय हा दीर्घ काळामध्ये लहान राहणार नाही, तो वाढणारच. या वाढीबरोबर उद्योग-व्यवसायाला लागणारी कार्यक्षमता तसेच दूरदृष्टी, बाजारपेठेची माहिती, भांडवल उभारणीसंबंधीची माहिती या सर्व गोष्टी नसतील तर व्यवसायाची वाढ खुंटते आणि असा व्यवसाय कालांतराने बंदसुद्धा पडण्याची शक्यता असते. यामुळेच प्रशिक्षित व्यवस्थापकांची गरज अशा प्रकारच्या कौटुंबिक स्तरावरील व्यवसायांनासुद्धा आहे. हे व्यवसाय जर वाढले तर त्यातून रोजगारनिर्मिती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो.
तसेच यासर्व बाबीच्या मार्गदर्शनासाठी रायसोनी महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्स इन फॅमिली मॅनेज बिजनेसचे कोर्सेस सुरु करण्यात येत असून सभोवतालच्या परिसरातील विध्यार्थ्यानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यानंतर प्रा. डॉ. मोनाली शर्मा यांनी कौटुंबिक व्यवसाय हा नव्याने सुरू करायचा असेल किंवा आहे तो व्यवसाय वाढवायचा असेल तर उद्योजकतेची मानसिकता असणे गरजेचे आहे.
उद्योजकतेबद्दल पुरेशी माहितीसुद्धा असायला हवी. त्याचबरोबर उद्योजकतेचे महत्त्व, ग्रामीण भागात उद्योजकता कशी विकसित करावी, उद्योजकतेला मदत करणाऱ्या संस्थांची माहिती. यांचीसुद्धा माहिती करून घेणे गरजेचे आहे. या कारणांमुळे उद्योजकता या विषयाची एक प्रश्नपत्रिका अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. सामाजिक उद्योजकता या संकल्पनेचाही या अभ्यासक्रमात समावेश आहे असे मत यांनी यावेळी व्यक्त केले.
यानंतर एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. राजकुमार कांकरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशावादी ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेसाठी स्वायत्त रायसोनी इस्टीट्यूट मोठ्या प्रमाणात सकारात्मक असून विध्यार्थ्यांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्टिफिकेट कोर्स इन फॅमिली मॅनेज बिजनेसचे कोर्सेस सुरु करण्यात आले आहे या कोर्सेस मुळे तरुणांना उद्योजकतेचे यशस्वी मार्ग मिळणार असून आपल्या कुटुंबाचा व्यवसाय अजून सक्षम कसा करावा याचेही मूलमंत्र या कोर्स मध्ये मिळणार आहे.
यावेळी प्रा. राहुल त्रिवेदी, प्रा. प्राची जगवाणी, प्रा. प्रतीक्षा जैन, प्रा. परिशी केसवानी, प्रा. डॉली मंधान यांनी कार्यशाळेला सहकार्य केले तर प्रा. तन्मय भाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले