ब्रेकींग : वाघूर योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील वाघूर प्रकल्पाला २ हजार २८८ कोटी रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी २०१९ साली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या काही दिवस आधीच जिल्ह्यातील चार योजनांसाठी सुधारित प्रशासकीय योजनांना मान्यता दिली होती. यात यात वाघूर योजनेसाठी २ हजार २८८ कोटी, हतनूर योजनेला ५३६ कोटी, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेला ८६१ कोटी तर शेळगाव बॅरेज योजनेला ९६८ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तारूढ झाल्यामुळे याला स्थगिती प्रदान करण्यात आली होती.

या पार्श्‍वभूमिवर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वाघूर योजनेसाठी २ हजार २८८ कोटी ३१ लाख रूपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. सुधारित प्रशासकीय मान्यता ही वाघूर प्रकल्पाची आजवरची एकूण सातवी सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. यात जामनेर, जळगाव आणि भुसावळ तालुक्यातील ३६ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Protected Content