जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री सत्य साई समिती जळगाव व बी. यु.एन. रायसोनी इंग्लिश मीडियम स्कूल प्रेमनगर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.7 श्री गुरुदत्त जयंतीचे औचित्य साधून दंत तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यात बी. यू. एन. राईसोनी इंग्लिश मीडियम स्कूल प्रेम नगर मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. म्हणतात ना सुंदर दात व्यक्तीचे व्यक्तिमत्व सुंदर बनविते. पण या दातांची लहानपणापासूनच निगा कशी राखावी व त्यांची योग्य ती काळजी कशी घ्यावी यासंबंधीची योग्य ती माहिती शिबिरात डॉक्टर पदमेश ठाकरे (B.D.S.) व डॉक्टर प्राची हुंडीवले (M.D.S.) यांनी व्यवस्थित रित्या दिली व सर्व विद्यार्थ्यांचे चेकअप शिक्षिका सौ.नीता चव्हाण व सर श्री. विशाल मते यांच्या उपस्थितीत व्यवस्थित रित्या केले. या शिबिरामागे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी नेहमी घेणे हे बी .यु .एन .रायसोनी स्कूलचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून शाळेचे अध्यक्ष श्री. शिरीष रायसोनी व उपाध्यक्ष श्री उमेद रायसोनी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.