मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात अखंड 15 वर्षांपासून संत महापुरुषांच्या विचार कार्यावरील चालू असलेली मानव सेवा हिच ईश्वर सेवा हि सेवाभावी वृत्ती जोपासलेली प.पु. गुरुवर्य संत रामभाऊ पुजारी बाबा सेवाभावी ट्रस्ट अंतर्गत रामरोटी आश्रम या सेवाभावी संस्थेकडून वर्षभर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत दिवाळीच्या सणासुदीला जे का रंजले गांजले, तयासी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा, देव तेथेंची जानावा या सत्य संत वचनाला अनुसरून सालाबादप्रमाणे या वर्षी सुद्धा दिवाळी निमित्ताने महिलांना साड्यांची व प्रत्येकी कुटुंबाला मोतीचूर लाडु, दराबा लाडू, चकली, शंकरपाळी, मिक्स रतलाम चिवडा, बारीक शेव व पापडी ई मिष्टान्न फरसाण साहित्याची वाटप पंचक्रोशीतील तांडे/पाडे, वस्तीवरील समाजातील वंचित, निराधार, गोर-गरीब व परिसरातील धार्मिक मंदीरावरील साधु महाराजांना असे 111 कुटुंबाला वाटप करुन त्यांचेही निरागस चेहर्यावर प्रेमळ हास्य फुलवुन त्यांची सुध्दा दिवाळी आनंदी करण्यात आली.
दिवाळी सणाच्या या गोरगरीबांच्या सेवा कार्यासाठी दानदाते संदीप खरे (गणेश झेरॉक्स),श्री स्वामी समर्थ सेवेकरी पुरुषोत्तम भाऊ वंजारी, डॉ गणेश माधव येवले नाशिक, जि के महाजन (जिल्हा बँक), पी एम चौधरी (जिल्हा बँक), संतोष पाटील शेमळदा, मनोज देशमुख(पोस्ट ऑफिस) , श्रीपाद डिजिटल एक्सरे मुक्ताईनगर या सामाजिक बांधिलकीची जान असणारे ज्ञात अज्ञात दानवीरांकडुन आणी रामरोटी आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करुन वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष किशोर गावंडे बापु,सचिव रामभाऊ टोंगे, रघुनाथ पाटील,किरण महाजन, प्रमोद गावंडे, पटेल सर, सुभाष माळी, मनोज बेलदार, अशोक कोळी व रामरोटी परिवारचे सेवक उपस्थित होते.