राम रहीम दोषी : १७ रोजी सुनावणार शिक्षा

पंचकुला वृत्तसंस्था । पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी राम रहीमसह चौघांना न्यायालयाने दोषी घोषीत केले असून त्यांना १७ जानेवारीस शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

सिरसा येथील पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्या प्रकरणात बाबा राम रहीम मुख्य आरोपी आहे. २००२ रोजी रामचंद्र छत्रपती यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. डेर्‍यात सुरु असणारी बेकायदेशीर कृत्यं पत्रकार रामचंद्र छत्रपती यांनी उघड केली होती. यामुळे चिडलेल्या राम रहिमने त्यांचा खून घडवून आणला होता. पोलिसांनी याच्या चौकशीत रामचंद्र छत्रपती यांच्यावर गोळी झाडणार्‍या एका आरोपीला अटक केली होती. चौकशीत त्याने आपण डेर्‍यात साधू असल्याचं सांगितलं होते. २००३ मध्ये न्यायालयाने रंजीत आणि रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. तपासात राम रहीम दोन्ही हत्येत मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं होते. यानंतर हा खटला प्रदीर्घ काळ चालून आज राम रहिमसह चौघांना दोषी ठरविण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content