आलोक वर्मा यांचा राजीनामा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । सीबीआयच्या संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आलोक वर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

आलोक वर्मा यांना निवड समितीने गुरुवारीच सीबीआयच्या संचालकपदावरून हटवले. त्यानंतर त्यांची वर्णी डी.जी. फायर सर्व्हिसेस अँड होम गार्ड या पदावर करण्यात आली. मात्र आलोक वर्मांनी हे पद स्वीकारण्यास नकार देत थेट राजीनामा दिला. १९७९ च्या केडरचे आयपीएस अधिकारी असलेले आलोक वर्मा सीबीआयचे २७वे संचालक होते. त्याआधी त्यांनी दिल्ली पोलीस आयुक्त म्हणूनही काम केलं. ३१ जानेवारीला ते निवृत्त होणार होते. १ फेब्रुवारी २०१७ रोजी त्यांची सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे ते वादात सापडले होते.

Add Comment

Protected Content