आयोध्या (वृत्तसंस्था) आम्ही राम भक्त आहोत. मंदिर कोणीही बांधले तरी, आम्हाला खुशी होईल पण शुभ तिथी आणि शुभ मुहूर्त असायला हवा. मंदिर एकदाच बांधले जाणार आहे, त्यामुळे याची भव्यता आणि रचना ठीक असायला हवी. तसेच राम मंदिरा भूमिपूजनाचा तिथी आणि मुहूर्त चुकीचा ठरवला असल्याचे म्हणत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
शंकराचार्यांनी मंदिराच्या भूमिपूजनाची वेळ अशुभ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही राम भक्त आहोत. मंदिर कोणीही बांधले तरी, आम्हाला खुशी होईल पण शुभ तिथी आणि शुभ मुहूर्त असायला हवा. स्वरूपानंद म्हणाले की, जनतेच्या पैशाने मंदिर बांधले जात असेल, तर जनतेचे मत विचारात घ्यायला हवे. तसेच अयोध्येच्या संत समाजाने स्वरूपानंदजी यांना आव्हानही दिले, शास्त्रार्थ ज्ञान दाखावायचे असल्यास ५ ऑगस्टला येऊन सिद्ध करा, असे म्हटले आहे. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती पुढे म्हणाले की, राम मंदिराची रचना कंबोडियामधील अंकोरवाट मंदिराच्या धर्तीवर व्हायला हवे.