राम मंदिरासाठी मोदींचे नव्हे राजीव गांधींचे योगदान : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरासाठी कोणतेही योगदान नाही. उलट यासाठी नाव घ्यायचे झाले तर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव घ्यावे लागेल, अशा शब्दांत भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. दरम्यान, स्वामींच्या या वक्तव्यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 

टीव्ही ९ भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, राम मंदिरामध्ये पंतप्रधानांचे कोणतेही योगदान नाही. यासाठी सर्व प्रकारच्या चर्चा आम्ही केल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे सरकारच्यावतीने त्यांनी असे कोणतेही काम केलेले नाही, ज्यामुळे हे सांगता येईल की राम मंदिर त्यांच्या प्रयत्नातून उभारले जात आहे. राम मंदिरासाठी ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि अशोक सिंघल यांचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील राम मंदिराच्या कामामध्ये आडकाठी आणली होती, अशोक सिंघल यांनीच आपल्याला ही बाब सांगितली होती.

Protected Content