राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं टाळ्या वाजवत आहेत — मोदी

 

पाटणा : वृत्तसंस्था । आज सर्वांची नजर अयोध्येवर आहे. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं आहे. राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजानं टाळ्या वाजवत आहेत,” अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची बिहारमध्ये दरभंगा येथे रॅली पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मोदींनी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरही भाष्य केलं. “प्रत्येक शेतकऱ्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार असल्याचं सांगितलं होतं. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. आज जवळपास ४० कोटी गरीबांची बँक खाती उघडली आहेत. बिहारमधील जवळपास ९० लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे,” असं मोदी म्हणाले.

Protected Content