राम जन्मोत्सवानिमित्त अखंड संकीर्तन सप्ताहास प्रारंभ

पहूर. ता. जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पहूर पेठ येथील श्रीराम मंदिर येथे रामनवमी निमित्त संगीत रामायण कथा व अखंड संकीर्तन सप्ताहास प्रारंभ झाला आहे.

 

पहूर पेठ येथील प्राचीन श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त संगीत रामायण कथा व अखंड संकीर्तन सप्ताहास प्रारंभ झाला आहे. सदर सप्ताहाचे हे १२२ वे वर्ष आहे. या सप्ताहाअंतर्गत संगीत रामायण कथा ह. भ. प.गजानन महाराज मांडवेकर( जामनेर) यांच्या मधुर वाणीतून होणार असून सप्ताहात दररोज सकाळी ५ ते ६ काकड आरती, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री साडे आठ ते साडे दहा हरी किर्तन तर दुपारी एक ते चार संगीत रामायण कथा होणार आहे. दि. ३ रोजी ह भ प देवराव आप्पा पिंपळगाव यांच्या किर्तनाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला असून दि. ४ रोजी ह. भ. प.पवन महाराज नांद्रा , दि. ५ रोजी ह. भ. प. विशाल महाराज कालगाव, दि. ६ रोजी ह. भ.प. आकाश महाराज जळके, दि. ७ रोजी ह.भ.प. संजय महाराज टाकळी, दि. ८ रोजी ह.भ प. माधव महाराज निपाणेकर , दि. ९ रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज सोयगावकर यांचे कीर्तन होणार आहे. तसेच दि. १० रोजी अशोक महाराज वनकोठा (एरंडोल) यांच्या राम जन्मोत्सवानिमित्त काल्याच्या कीर्तन सकाळी दहा ते एक या वेळेत होणार नंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी सदर सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम मंदिर ट्रस्टच्यावतीने व पहूर पेठ ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

Protected Content