रामदास कॉलनीत कार्यालयात जबरदस्तीने घुसून सामान नेले

जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | रामदास कॉलनीत एका व्यापाऱ्याच्या कार्यालयात बेकायदेशीररित्या प्रवेश करून शिवीगाळ व धमकी देत कार्यालयातील ईलेक्ट्रॉनिक वस्तू, सोन्याचे शिक्के, मुळ कागदपत्रे यांसह संगणक, बँकेचे चेक आदी वस्तूं जबरी रिक्षातून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज लिलाधर वाणी (वय-४०) रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे रामदास कॉलनीत मनोकल्प ट्रेंडींग ॲण्ड सर्व्हिसेस नावाचे कार्यालय आहे. ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान, कार्यालयातील शिपाई प्रदीप बारी कार्यालयात असतांना जितेंद्र उर्फ रवि बाबुराव देशमुख, विनोद पंजाबराव देशमुख, जगदीश पुंडलिक पाटील, मिलींद नारायण सोनवणे, रितेश देवराम  पाटील, कैलास पाटील, कलाबाई शिरसाठ यांच्यासह इतर अनोळखी ३ ते ४ जण हे स्कॉर्पीओ गाडीत येवून मनोज वाणी यांच्या कार्यालयात शिपाई प्रदीप बारी याला धमकावून बेकायदेशीररित्या घुसले. यावेळी सर्वांनी कपंनीच्या मुळ रेकॉर्ड, मौल्यवान दस्तावेज, संगणक, रोख रक्कम, लॅपटॉप, चांदीचे व सोन्याचे शिक्के असा सामान जबरी घेवून जात असतांना मनोज वाणी तिथे आले. त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता जितेंद्र उर्फ रवि देशमुख आणि विनोद देशमुख यांनी अश्लिल शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी मनोज वाणी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा संशयित आरोपी जितेंद्र उर्फ रवि बाबुराव देशमुख, विनोद पंजाबराव देशमुख, जगदीश पुंडलिक पाटील, मिलींद नारायण सोनवणे, रितेश देवराम  पाटील, कैलास पाटील, कलाबाई शिरसाठ यांच्यासह इतर अनोळखी ३ ते ४ जण असे एकुण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content