रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाचे आसाम निवडणुकीत ११ उमेदवार

 

मुंबई: वृत्तसंस्था । आसाम विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

 

बुधवारी रामदास आठवले   आसाममध्ये प्रचार दौरा करणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी ही माहिती दिली.

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 11 उमेदवार स्वबळावर लढत असून उर्वरित जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

 

पाथरकांडी ,   सिलचर  ,  बिळाशीपुरा  ,  सारभोग  ,  भाबनीपूर  ,  पटारकुची ,  बघबोर  ,  चेंगा  ,  गुवाहाटी पूर्व  ,  गुवाहाटी पश्चिम  ,  चबूआ हे ते ११  मतदारसंघ आहेत .

Protected Content