रामजी आंबेडकर विद्यालयात लाखोंचा घोटाळा : प्रभारी अध्यक्षांचा आरोप

crime 4 3

भुसावळ, प्रतिनिधी | येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था संचलित सुभेदार रामजी आंबेडकर विद्यालयात शिक्षक भरतीच्या नावाखाली लाखोंचा घोटाळा झाल्याचा आरोप प्रभारी अध्यक्ष वसंत पाटील यांनी आज (दि.३०) एका पत्रकार परिषदेत केला आहे.

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेमध्ये सन २०१० ला आयुक्तांनी निवडणूक घेण्याचे व सभासद नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नूतन १५ कर्मचाऱ्यांचे पॅनल विजयी झाले होते. निवडून आलेल्या कार्यकरिणीमधून अध्यक्षपद सपकाळे यांना देण्यात आले होते. मात्र मयत झाल्यामुळे उपाध्यक्षपदी रुजू असलेले वसंत पाटील यांनी घटनेनुसार प्रभारी अध्यक्ष पद देण्यात आले होते.

संस्थेमध्ये पी.एस.सोनवणे नावाची व्यक्ती आजपर्यंत निवडून आलेली नसून संस्थेची बोगस कागदपत्रे तयार करून शिक्षक भरती करण्याच्या बोगस जाहिराती प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगारांची लाखोंची फसवणूक करीत आहेत. तसेच संस्थेची सभासद फी युनियन बँकेत १५ लाख रुपये ठेवलेले आहे, ते पी.एस.सोनवणे व बँक मॅनेजर यांच्या संगमताने काढून भ्रष्टाचार केल्याचा आरोप संचालकांनी केला आहे. तसेच सुषमा धर्मराज महाजन यांनी पी.एस.सोनवणे यांना शिक्षक भरतीसाठी १८ लाख रुपये दिल्याची माहिती संचालकांनी दिली असून संपूर्ण घोटाळा ५५ लाख रुपयांचा असल्याचे प्रभारी अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

Protected Content