
अहमदनगर (वृत्तसंस्था) काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हे महाविकास आघाडीत परत येतील. ते काँग्रेस विचारांचे आहेत. विखे पाटील नाईलाजाने तिकडे गेले आहेत, असा दावा ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. अहमदनगर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विखे पाटील हे पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीम यांनी केला आहे. दरम्यान, जोपर्यंत उद्धव ठाकरे, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे तोपर्यंत सरकार चालेल आणि ते किमान 15 वर्ष चालेल. किमान समान कार्यक्रमावर हे सरकार चालेल”, असेही हसन मुश्रीम म्हणाले. दरम्यान, मुश्रीफ यांच्या दाव्यानंतर राजकीय वर्तूळात एकच चर्चेला उधान आले आहे.