जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणात दोन समाजात तेढ निर्माण करणारे व्यक्तव्य केले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जिल्हा महानगरतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे २०२२ रोजी औरंगाबाद येथील जाहिर सभेचे लाईव्ह टेलिकास्ट सुरू असल्याने आम्ही न्युज चॅनेल वर हि संपुर्ण सभा पाहिली व ऐकली . सदर सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर , दोन समाजात तेढ निर्माण करणारे व समाज विध्वंसक होऊन राज्यभरात अशांतता निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडेल असे वक्तव्य करत असामाजिक कृत्य केलेले आहे . तसेच त्यांनी महापुरुषांच्या इतिहासाबद्दल चुकीची माहिती पसरवुन जनतेची दिशाभूल केलेली आहे. यासर्व प्रकारांमुळे आमच्या व सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत . त्यामुळे त्यांचे संपूर्ण भाषण ऐकून त्यांच्यावर भारतीय संविधानात तरतूद असल्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी. याप्रसंगी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील , सुनील माळी , राजू मोरे , सुशील शिंदे , अमोल कोल्हे , डॉ. रिजवान खाटिक , किरण राजपूत , अकिल पटेल , राहुल टोके , नईम खाटिक , जितू बागरे , किरण चव्हाण आदी उपस्थित होते.