मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आज किंवा उद्या या आदेशांवर सही करणार असल्याची माहिती मंत्री विजय वड्डेटीवर यांनी दिली आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जिम सुरु करण्याची मागणी केली होती.
आगामी दोन दिवसांत राज्यात जिम सुरु करणार अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. राज्य सरकाने जिम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आज किंवा उद्या या आदेशांवर सही करणार असल्याचे विजय वड्डेटीवर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपाकडून जिम सुरु करण्याबाबत मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत होती. तत्तपूर्वी, राज ठाकरेंनी तुम्ही जिम सुरु करा. जिम सुरु केल्यानंतर कोण कारवाई करतेय बघू, असे राज ठाकरेंनी सांगितले होते. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझे बोलणे झाले. त्यांचेही म्हणणे आहे की जिम सुरु झाले पाहिजे. आता मी सांगतोय जिम सुरु करा, ज्याला यायचे आहे, तो जिमला येईल. बघू काय होतेय, असे राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले होते. तर दारूचे दुकाने सुरु करतात. परंतू जिम बंद ठेवतात, हे दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.