जिल्ह्यात आज १२०५ कोरोना बाधीत; बळींची संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये १२०५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या सोळाशेच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात १२०५ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधीक रूग्ण हे जळगाव शहर व चोपडा तालुक्यातील असत. आज चोपडा तालुक्यात पुन्हा संसर्ग पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या तालुक्यात तब्बल ३९२ रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर जळगाव शहरात २८० कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

दरम्यान, आजच ९२० रूग्ण बरे देखील झाले असून १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा बळी गेलेल्यांची संख्या तब्बल १५९७ इतकी झालेली आहे. म्हणजेच कोरोनाचे बळी आता सोळाशेच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत.

उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, जळगाव तालुका-५०; भुसावळ-३६; अमळनेर-९३; पाचोरा-३३; भडगाव-६३; धरणगाव-२९; यावल-२६; एरंडोल-२०; जामनेर-६१; रावेर-३७; पारोळा-१०; चाळीसगाव-२६; मुक्ताईनगर-३०; बोदवड-१६; इतर जिल्ह्यातील-३ असे रूग्ण आढळून आले आहेत.

Protected Content