मुंबई : वृत्तसंस्था । राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. मराठा आरक्षण, वाढीव वीजबिलासह इतर महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
सह्याद्री अतिथीगृहाजवळ ही बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकासआघाडीचे वरिष्ठ मंत्री उपस्थित आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे अनेक राज्य मंत्रिमंडळ बैठकींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहत होते. मात्र यानंतर आज पहिल्यांदा प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची प्री-कॅबिनेट बैठक पार पडली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीला शिवसेनेचे नेते उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीपूर्वी ही बैठक झाल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.