मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत चार नवे कोरोनाग्रस्त रूग्ण मुंबईत सापडल्यामुळे आता राज्यात कोरोना रूग्णांची संख्या पोहचली ११६ वर पोहोचली आहे. मुंबईत एकूण कोरोना रूग्ण ४५ कोरोनाबाधित सापडले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगीतले की, महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०७ वरुन ११६ वर गेली आहे. आज सांगली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांना संसर्गातून बाधा झाली. तर चार व्यक्ती अशा आहेत ज्या मुंबईतल्या आहेत. त्यांना प्रवासाचा इतिहास किंवा संसर्ग असे कारण आहे. दरम्यान १४ सदस्य हे डिस्चार्जच्या प्रक्रियेत असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले आहे. मंगळवार संध्याकाळ ते बुधवार दुपार या कालावधीत नऊ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ११६ झाली आहे असेही टोपेंनी स्पष्ट केले आहे.