राज्यात कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ सुरूच

मुंबई प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू असतांनाही कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत राज्यभरात आज तब्बल ८१ रूग्णांची वाढ झाल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.

राज्यभरात ८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या आा ४१६ झाली आहे. पुण्यात सहा, पिंपरी चिंचवडमध्ये तीन, मुंबईत ५७, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच, बुलढाण्यात १ असे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या ४१६ वर गेली असल्याची माहिती राज्य आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. आत्तापर्यंत ४२ रुग्णांना डिस्चार्ड देण्यात आला आहे असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्याने सगळे महत्त्वाचे व्यवहार ठप्प आहेत. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण देशही लॉकडाउन करण्यात आला आहे. देशात करोना रुग्णांची संख्या २ हजारांच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रातली संख्या ४१६ झाली आहे. इतर राज्यातही रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे स्वयंशिस्त पाळा, घराबाहेर पडू नका असे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content