पुणे प्रतिनिधी । जगभरात धुमाकुळ घालणार्या कोरोना व्हायरसची लागण आता महाराष्ट्रातही झाली असून आतापर्यंत राज्यात याचे एकूण चार रूग्ण आढळून आले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग काल आढळून आला होता. काल दोन रूग्णांना या विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. यात अजून दोन नवीन रूग्णांची भर पडली आहे. पुणे येथील एकूण चार जणांना याची बाधा झालेली आहे. यात चीनहून दुबईमार्गे भारतात आलेल्या दाम्पत्याचा समावेश आहे. याशिवाय संबंधीत दाम्पत्याची मुलगी आणि चारचाकीचा वाहक यांनाही याची लागण झाल्याचे उघड झाले आहे. या सर्वांवर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.