राज्यातील सरकार हे डुप्लिकेट – अंबादास दानवे 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे डुप्लिकेट खताचा साठा जप्त झाला. खरंतर राज्यातील सरकारच डुप्लिकेट आहे, तर खते का नाहीत. ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातुन मिळणार्‍या आनंदाच्या शिध्याची अद्याप बर्‍याच गावांना वाटप झाली नाही. काहींना दोन वस्तु मिळाल्या तर काही अजुनही प्रतिक्षेत आहेत. आजचे सरकार आहे ते शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे. मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी बुलेट ट्रेन साठी दहा हजार कोटी मंजूर झाले.

परंतु अतिवृष्टी व प्रोत्साहन भत्यासाठी यादी तयार आहे का ? अनुदान गरजवंतापर्यंत पोहचले की नाही ? याकडे पाहायला सरकारला वेळच नाही. न्यायालयाच्या लढाईचा निकाल केव्हाही लागु शकतो. तरी शिवसैनिकांनी आतापासूनच तयारीला लागा केव्हाही निवडणुकीला सामोरे जावे लागेल असे शिवसेनेचे विरोधीपक्षनेते ना.अंबादास दानवे यांनी पाचोरा येथील शिवसैनिकांशी संवाद साधतांना अवाहन केले.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवतीर्थ या शिवसेना कार्यालय येथे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधान परिषद ना. अंबादास दानवे यांची सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेनेच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सूर्यवंशी, संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजू राठोड, जळगांव जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, शेतकरी सेने जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, युवा उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, भरत खंडेलवाल, हरिष देवरे, प्रितेश जैन, उद्धव मराठे, राजेंद्र पाटील, पपु जाधव, पप्पु राजपुत, अजय पाटील, आनंद संघवी, खंडु सोनवणे आदी प्रमुख पदाधिकांर्‍यासह शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी रमेश बाफना यांनी प्रास्ताविकात मतदार संघासह जिल्ह्यातील राजकिय व सद्यस्थितीची माहीती दिली. डाॅ. हर्षल माने यांनी शिवसैनिकांनी पक्ष संघटनाकडे लक्ष द्यावे असे अवाहन केले. तर वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांनी मनोगतात ना. अंबादास दानवे यांना पाचोरा मतदार संघात आपण स्वतः लक्ष घालून आम्हाला प्रेरणा आणि मार्गदर्शन करण्याचे अवाहन करित मतदार संघातील शेतकर्‍यांचा प्रश्न विधिमंडळात मांडावा अशी मागणी केली.

यावेळी बोलतांना ना. दानवे म्हणाले की, मी महाराष्ट्रात फिरत असतांना जाणवत आहे फक्त थोडासा मनात आत्मविश्वास बाळगण्याची गरज आहे. मी ठाणे मतदार संघात देखील फिरलो १० टक्के देखील शिवसैनिक गेलेले नाहीत. खऱ्या हाडाचे शिवसैनिक आपल्या सोबत आहे. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरा शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याच्यावर लक्ष केंद्रीत करा. असे शिवसैनिकांना महाराष्ट्राचे शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते ना. अंबादास दानवे यांनी भावनिक अवाहन केले.

यावेळी पाचोरा – भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात आले. सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार अॅड. अभय पाटील यांनी मानले.

Protected Content