मुंबई प्रतिनिधी । नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यात कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार तर फळबागा धारकांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मिळणार आहेत.
याबाबत वृत्त असे की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी राज्यातील जनतेला संबोधित केले. यात त्यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले यात कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजार तर फळबागा असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २५ हजार अशी मदत मिळणार आहे. फळबागा धारकांना जास्तीतजास्त दोन एकरसाठी नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. दरम्यान राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार त्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले तर राज्यातील रस्ते पूल दुरुस्तीसाठी त्यांनी २६ ते ३५ कोटी रुपये नगर विकासासाठी ३०० कोटी रुपये देखील जाहीर केले.