मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश लवकरच काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत दिली.
मुस्लिम आरक्षणासंदर्भात मागच्या सरकारचा अध्यादेश रद्द करण्याचे आदेश होते. त्यामुळे अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाले नव्हते. त्यामुळे 2014 प्रमाणेच अध्यादेश काढून कायद्यात रुपांतर करु किंवा मुस्लिम आरक्षणबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे, ते लक्षात घेऊन शैक्षणिक आरक्षणाबाबत कायदा करु. मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लागू करण्याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. अल्पसंख्याक समाजाच्या आमदारांनी सरकारच्या या घोषणेचे जोरदार स्वागत केले आहे.