जळगाव, प्रतिनिधी । विश्व हिंदू परिषद बजरंग दल जळगाव यांच्यातर्फे राज्यातील मंदिरे दर्शनांसाठी उघडण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्रातील समस्त मंदिरे देवदर्शना करिता उघडण्यात यावे. जेणेकरून कोरोना सारख्या महामारीच्या काळात देवदर्शनाच्या प्रेरणेने सकारात्मक ऊर्जा तमाम समाजाला प्राप्त होईल. या धी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घंटानाद करुन महाराष्ट्रातील समस्त मंदिरे उघडण्याबाबत घोषणा देण्यात आल्या.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार , बजरंग दल जिल्हा संयोजक राकेश लोहार, जिल्हा प्रचार प्रसिद्धी प्रमुख महेश अंबिकार, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे, महानगर मंत्री दीपक दाभाडे, बजरंग दल महानगर संयोजक समाधान पाटील, शहर प्रखंड संयोजक पवन शिंपी , राहुल जोशी इत्यादी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.