कोरोना : राज्यातल्या ६ शहरांमधली जीम, स्विमिंग पूल, मॉल बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या ६ शहरांमधली जीम, स्विमिंग पूल, मॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

 

विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरमधल्या जीम, स्विमिंग पूल, मॉल आज रात्री १२ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहेत. तसेच चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इराण या ७ देशांना भेट दिली असेल आणि आज संध्याकाळी ५:३० नंतर देशात विमानाने येतील त्यांना स्थानबद्ध करण्यात येईल, असे देखील उद्धव ठाकरेंनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १७ वर पोहोचली आहे.

Protected Content