राज्यस्तरीय संपात शासकीय महाविद्यालय, रुग्णालयातील कर्मचारी सहभागी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता मंगळवारपासून संपावर गेली आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र कामकाज केले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनादेखील सहभागी झाल्या आहेत, मात्र रुग्णांचा विचार करून त्यांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा केली. राज्य वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने देखील संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

 

राज्यभरातील १७ लाख सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयातील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपत सहभाग घेतला आहे. मंगळवारी सकाळी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणा दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी संप न करता, महाविद्यालय व रुग्णालय आपत्कालीन सेवेत येत असल्याने फक्त पाठींबा देऊन कामावर या असे आवाहन केले. मात्र त्यानंतरही घोषणा देऊन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथील सार्वत्रिक मोर्चेकऱ्यांमध्ये सहभागी झालेत.

 

मोर्च्यात विजय जगताप, गोपाल साळुंखे, दिलीप मोराणकर, जे. एस. गवळी, समीर देवसंत, गणेश घुगे, नरेंद्र पाटील, गणेश धनगर, सूर्यकांत वसावे, देविदास गायकवाड, शीतल राजपूत, विजया बागुल, मंगेश जोशी, क्षितिज पवार, शामकांत दुसाने, विलास वंजारी, जे. एस. शिंदे, अनिल अवसरमल, संतोष टकले, प्रमोद वानखेडे, तुषार निळे, शिवकुमार पदरे, साहेबराव कुडमेथे, अनिल कापुरे, उमेश टेकाळे, गोपाल बहुरे, प्रकाश पाटील, किशोर आव्हाड, गणेश धनगर, प्रवीण डांगे आदी उपस्थित होते.

 

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत जिल्हा परिचारिका संघटना अध्यक्ष जयश्री जोगी यांनी माहिती दिली. प्रसंगी, “जुनी पेन्शन, एकच मिशन” ” ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. रुग्णालयात आधीच परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात, साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करून रुग्णालयात येणाऱ्या आपत्कालीन रुग्णांचा विचार करिता परिचारिकांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचे कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शवित कामकाज केले.

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीनेदेखील बाहेरून पाठिंबा दिला आहे.राज्यस्तरीय संपात शासकीय महाविद्यालय, रुग्णालयातील कर्मचारी सहभागी

 

परिचारिका संघटनेने काळ्या फिती लावून केली रुग्णसेवा ; प्राध्यापक संघटनेचा बाहेरून पाठिंबा

 

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता मंगळवारपासून संपावर गेली आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र कामकाज केले. दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनादेखील सहभागी झाल्या आहेत, मात्र रुग्णांचा विचार करून त्यांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा केली. राज्य वैद्यकीय प्राध्यापक संघटनेने देखील संपाला बाहेरून पाठिंबा दिला आहे.

 

राज्यभरातील १७ लाख सरकारी कर्मचारी हे बेमुदत संपावर गेले आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयातील सुमारे ५० कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपत सहभाग घेतला आहे. मंगळवारी सकाळी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत घोषणा दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी संप न करता, महाविद्यालय व रुग्णालय आपत्कालीन सेवेत येत असल्याने फक्त पाठींबा देऊन कामावर या असे आवाहन केले. मात्र त्यानंतरही घोषणा देऊन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथील सार्वत्रिक मोर्चेकऱ्यांमध्ये सहभागी झालेत.

 

मोर्च्यात विजय जगताप, गोपाल साळुंखे, दिलीप मोराणकर, जे. एस. गवळी, समीर देवसंत, गणेश घुगे, नरेंद्र पाटील, गणेश धनगर, सूर्यकांत वसावे, देविदास गायकवाड, शीतल राजपूत, विजया बागुल, मंगेश जोशी, क्षितिज पवार, शामकांत दुसाने, विलास वंजारी, जे. एस. शिंदे, अनिल अवसरमल, संतोष टकले, प्रमोद वानखेडे, तुषार निळे, शिवकुमार पदरे, साहेबराव कुडमेथे, अनिल कापुरे, उमेश टेकाळे, गोपाल बहुरे, प्रकाश पाटील, किशोर आव्हाड, गणेश धनगर, प्रवीण डांगे आदी उपस्थित होते.

 

दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत जिल्हा परिचारिका संघटना अध्यक्ष जयश्री जोगी यांनी माहिती दिली. प्रसंगी, “जुनी पेन्शन, एकच मिशन” ” ‘जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. रुग्णालयात आधीच परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात, साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करून रुग्णालयात येणाऱ्या आपत्कालीन रुग्णांचा विचार करिता परिचारिकांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचे कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शवित कामकाज केले.

 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणीला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या वतीनेदेखील बाहेरून पाठिंबा दिला आहे.

Protected Content