चाळीसगाव, प्रतिनिधी | सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा यंदाचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांना जाहीर झाला आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच चर्चेत असलेले चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाढीवाल यांना यंदाचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यातील मोजक्या लोकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समिती यांनी पत्र देऊन धाडीवाल यांना कळविले आहे. पुरस्कार देऊन सन्मानित केल्याने समाजात अशाप्रकारचे काम करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचे मनोबल वाढते व काम करण्यास प्रेरणा मिळते या उदात्त हेतूने या समितीने हा राज्यस्तरीय पुरस्कार वर्धमान धाडीवाल यांना जाहीर केला आहे. ते १६ जानेवारी रोजी मराठा दरबार मालेगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष तानाजीराव शिंदे (विशेष पोलीस अधिकारी, मालेगाव) परिमंडळ रंजन खरोटे (अध्यक्ष सामाजिक प्रबोधन संघ महाराष्ट्र) व सचिव अमोल निकम यांनी त्यांना सहपरिवार आमंत्रित केले आहे.