कासोदा प्रतिनिधी । येथील साधना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्याराज्यस्तरीय भौगोलिकशास्त्र परिक्षा घेण्यात आले. या परिक्षेत शाळेतील नववीतील विद्यार्थीनी यामिनी रमेश चौधरी हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे.
आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत परीक्षेसाठी विद्यालयातून ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. तीन महिने उलटल्यानंतर परीक्षेचा निकाला जाहीर करण्यात आला होता. त्यात साधना विद्यालयाची नववीतील विद्यार्थिनी यामिनी रमेश चौधरी हीला सुवर्णपदक देण्यात आले. तर विद्यालयाचा १०० टक्के रिझल्ट लागला. असून ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे १५ विद्यार्थी तर इतर सर्व विद्यार्थी डिस्टींक्शन श्रेणीत उत्तीर्ण झाले. ३० जानेवारी २०२० रोजी यामिनीचा शिक्षकांच्याहस्ते गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले . परीक्षेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्द्ल जेष्ठ शिक्षिका श्रीमती एल. बी. पाटील यांचा सत्कार श्रीमती एम.एस.पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.