राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा : जिल्ह्याचा संघ रवाना”

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  आपण या वयात मोठ्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहात म्हणून मला आपला रास्त अभिमान आहे कारण मी स्वतः फुटबॉल मध्ये विद्यापीठ पातळीवर खेळलो असलो तरी जिल्ह्याचे प्रतिनिधी केलेले नसल्याने मला  ती खंत  असल्याचे पोलिस अधीक्षक एस. राजकुमार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे १४ वर्षातील मुलांचा फुटबॉल संघाला शुभेच्छा देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

आंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन द्वारा २५ मे पासून करण्यात आले असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा १४ वर्षातील मुलांचा संघ निवडण्यात आला व त्या संघाला आज जिल्हा क्रीडा संकुल येथे एका छोटे खानी कार्यक्रमात निरोप देण्यात आला.  जळगाव चा पहिला सामना २५ मे रोजी वर्धा जिल्हा सोबत होणार आहे.

 

यांची झाली निवड

 

कर्णधार पदी अनुभूती शाळेचा आयुष भोर तर  उप कर्णधार पदी अमळनेर च्या सैय्यद अलतमश, ध्रव भुजवाणि, आयुष भोर,  तुषार गुजर, ॠषीकेश परदेशी, कौशतुब महाजन, ताबीश खान, देवेंद्र पाटील, अनय रडे ( सर्व जळगाव) ; सुशांत गायकवाड,आदित्य जोशी, प्रतीक सराफ, रयान रोस, आशुतोष मिश्रा, कलश गवले,लोकेश पाटील ( सर्व भुसावळ); मारूफ खान, सैय्यद अलतमश, कुणाल देवकाते (सर्व अमळनेर)

संघ प्रशिक्षक भूषण पाटील सहाय्यक प्रशिक्षक राहील अहमद तर संघ व्यवस्थापक जैन सपोर्टर्स अकॅडमी चा अब्दुल मोहसिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

जिल्हा संघटनांचे प्रतिनिधीची होती उपस्थिती

 

जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांनी दूरध्वनीद्वारे खेळाडूंना शुभेच्छा  दिल्या तर यावेळी डॉक्टर अण्णासाहेब बेंडाले महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका तथा कार्य अध्यक्ष डॉक्टर अनिता कोल्हे, संघटनेचे सचिव फारूक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज सुरवाडे, भास्कर पाटील, एडवोकेट आमिर शेख, मोसिस चार्ल्स आदींची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी केले तर आभार अब्दुल मोहसीन व सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी केले

Protected Content