राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त दिपक धनगर यांचा सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील गोरडखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक धनगर यांना नुकतेच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी  त्यांचा सत्कार केला.

 

गोराडखेडा  येथील जि. प. शाळेतील गुणवंत शिक्षक दिपक धनगर यांना नुकतेच राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांचेतर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिपक धनगर यांचा गोराडखेडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत पवार यांच्या सह संपूर्ण शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक धनगर यांनी दत्तक घेतलेल्या मुलीस गुणवंत पवार यांच्या हस्ते सामान्य ज्ञानाचा ठोकडा बक्षीस देण्यात आला. दिपक धनगर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Protected Content