जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात रविवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय आंतर शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांच्याहस्ते करण्यात आली.
क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिष आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३१ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा होणार आहेत. रविवारी २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांच्याहस्ते बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी श्री छत्रपती पुरस्कार विजेते गणपतराव पोळ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, मुख्य पंच स्वप्निल बनसोड, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अरविंद देशपांडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, रवींद्र धर्माधिकारी व प्रवीण ठाकरे व अहमदनगरचे आर्बिटर यशवंत बापट यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सर्व प्रथम दीप प्रज्वलित करण्यात आले, खेळाडूच्या वतीने मुंबईचा खेळाडू ओम कदम यांनी शपथ घेतली. प्रमुख अतिथी राहुल पाटील यांनी पटलावर चाल चालून उदघाटन केले व खेळाडूंना मार्गदर्शन केले. या स्पर्धेत राज्यातील १६० मूले व मुली खेळाडूंचा सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मुलींद दीक्षित यांनी सादर केले. सूत्रसंचलन फारूक शेख यांनी तर आभार क्रीडा मार्गदर्शक मीनल थोरात यांनी मानले.