मुंबई वृत्तसंस्था । गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपालांनी नाईक कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मारला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्नब गोस्वामी यांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असून यावर नवाब मलिक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या संदर्भात मलिक म्हणाले की, ज्या राज्यात प्रत्येक जेलमध्ये असणार्या कैद्याच्या जीवाची किंवा आरोग्याची जबाबदारी सरकारची असते. जेलमधील कैद्याला नातेवाईकांना भेटण्यासही परवानगी दिली जात असते. परंतु ज्यापध्दतीने राज्यपाल एक विशेष कैदी असलेल्या अर्नव गोस्वामीला सहानुभूती दाखवतात. नाईक कुटुंब बरेच महिने न्यायासाठी भटकत होते त्यांची बाजू न घेता एका आरोपीची घेणे हे योग्य नसल्याची टीका नवाब मलिक यांनी केला आहे.