धरणगाव, प्रतिनिधी । कोरोना महामारीचे संकट ओढवले असून याचा सामना करण्यासाठी धरणगाव नगरपालिकेचे कर्मचारी जोमाने काम करीत आहेत. या आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम पाहून व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राजे प्रतिष्ठान धरणगाव शहराध्यक्ष राजेंद्र महाजन यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आर्थिक सहाय्य केले आहे.
धरणगाव येथील राजे प्रतिष्ठानचे शहर अध्यक्ष राजेंद्र साहेबराव महाजन यांनी आपला वाढदिवस साजरा न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणीव जपत धरणगाव नगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली. हे आरोग्य कर्मचारी जोमाने काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रुपये २१०० चा धनादेश नगरपालिका फण्डात श्री. महाजन यांनी जमा केला. हा धनादेश स्वीकारतांना शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक वासुदेव चौधरी, विजय महाजन, भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख विशाल महाजन, शिव व्याख्याते ललित पाटील, बाळू जाधव, अरविद चौधरी, गोलू चौधरी, समाधान पाटील, ललित मराठे, अमोल माळी आदी उपस्थित होते.