जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राजेश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये अद्ययावत मशिनरी व कुशल डॉक्टरांच्या सहकार्याने स्वतंत्र हृदयरोग विभाग लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जळगाव पीपल्स बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे, पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व विश्वस्त यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नामंकित कंपनीची आधुनिक कॅथलॅब मशीनद्वारा या हृदयरोग (कॅथलॅब) विभागात कार्डियाक कन्सल्टेशन, ईसीजी, 2-डी इको (कार्डीओग्राफी), अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, डायटिक कोन्सिलिंग, पेसमेकर, एटोटिक, आणि मीट्रल वलून, वल्वप्लास्टी आदी स्वरूपाच्या सेवा रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे शासकीय योजनांतर्गत पात्र असलेल्या सर्व रुग्णांना या कॅथलॅबचा मोफत लाभ घेता येणार आहे. सदर हॉस्पिटलमध्ये शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना आदी योजना लागू करण्या आलेल्या आहेत. यासोबत इतर इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा देखील उपलब्ध आहे. तरी गरजू रुग्णांनी सर्व योजनांचा आणि हॉस्पिटलमधील आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश चौबे तसेच पीपल्स बँकेचे अद्यक्ष भालचंद्र पाटील व इतर सर्व विश्वस्तांनी केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1985280531678893