जळगाव, प्रतिनिधी । राजनंदिनी बहुउद्देशिय संस्था आणि अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गोड दसरा या संकल्पनेतून हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या स्मशानभूमीतील सेवकांचा सिंधी कॉलनीतील सेवामंडळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद विसराणी व संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोना कालावधीत अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागला. त्यांच्या मु्तदेहावर जिवाची बाजी लावत स्मशानभूमीतील सेवकांनी अंत्यसंस्कार केले. कोरोना महामारीच्या भीतीमुळे अनेक मुलांनी त्यांच्या सख्या आई, वडिलांवर सुद्धा स्वत: अंत्यसंस्कार करणे टाळले. परंतु, स्मशानभूतील या सेवकांनी त्यांचे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे बजावले. यानिमित्त त्या सेवकांबद्दल कु्तज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच हिंदू बांधवांच्या स्मशानभूमीप्रमाणेच मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थानमधील सेवकांचा देखील सत्कार करण्यात आल्याने या कु्तज्ञता सोहळ्यात हिंदू-मुस्लिम बांधवांच्या एकात्मतेचे दर्शन झाले.
यावेळा स्मशानभूमीतील सेवक धनराज सपकाळे, काशिनाथ बिऱ्हाडे, पंढरीनाथ बिऱ्हाडे, अनिस शाह, इसाफ बागवान, शब्बीर पटेल यांचा सत्कार करण्यात आला. या सेवेकऱ्यांना शाल, श्रीफळ, ड्रेस व मिठाई देवून गोड दसरा साजरा करण्यात आला. तसेच सध्या कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत आहे. रुग्णांचा मुुत्यूदरही घटला. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याने डॉ. रामानंद यांचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघ यांनी केले.
याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ. विजय गायकवाड, डॉ. इम्रान पठाण, डॉ.सोनार, प्रा.डॉ. संगीता गावीत, माजी नगरसेवक अशोक मंधाण, भगत बालाणी, जगदीश कुुकरेजा, विजय दारा, हरदयाल कुकरेजा, सतीश मताणी, निलू मलिक, वासुभाई बुधाणी, शेखर मोतीरामाणी, कन्हैय्या कुकरेजा आदी उपस्थित होते.