मुंबई प्रतिनिधी । विख्यात चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी शोषण केल्याचा आरोप एका महिलेने लावल्यामुळे खळबळ उडाली आहे.
संजू सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शनाचे काम केलेल्या महिलेने हिरानी यांच्यावर आरोप केले आहेत. या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनच्या वेळी हिरानी यांनी आपले शोषण केले असा या महिलेचा आरोप आहे. याबाबत द हफींग्टन पोस्ट हा संकेतस्थळाने वृत्त दिले आहे. आपल्यावरील अत्याचाराबाबतची माहिती या सिनेमाचे सहनिर्माते विधु विनोद चोप्रा यांना ईमेलद्वारे दिली होती, असा दावा या महिलेने केला आहे. तर, हिरानी यांनी महिलेचे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी आपण कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी मी तयार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.