अमळनेर प्रतिनिधी । येथील राकेश चव्हाण याच्या खून प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केले असून आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे.
येथील सराईत गुन्हेगार राकेश चव्हाण याचा शुक्रवारी सायंकाळी ख्वाजा नगरात जमावाने खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. त्यांना १५ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामीन मिळाल्याने राकेश चव्हाण हा लातूर कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी कादर शेख फकीर (वय ४६), गुलाम कादर अब्दुल रशीद पिंजारी (४२), शरीफ मोइनोद्दीन मेहतर (३९), इम्रान शेख उस्मान (४५) यांना खुनाच्या गुन्ह्यात अटक केली.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००