रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण; तरूणांनी व्यक्त केला महापालिकेचा निषेध

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यानिमित्ताने काही जागृत तरूणांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रोपटे लावून महापालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, आज रक्षाबंधन असल्यामुळे सर्व नूतन मराठा कॉलेजचे माजी विद्यार्थी भेटण्याचा आग्रह केला. नूतन मराठा कॉलेज समोरच असलेले चाय पिण्याचा माजी विद्यार्थ्यांचा कट्टा आहे. सगळे माजी विद्यार्थी कट्ट्यावर जमा झाले होते. चर्चा सुरूच होती अचानक समोरच असलेले रस्त्याच्या मधोमध असलेले खड्ड्यांमध्ये दुचाकीने जाणारे खड्ड्यांमध्ये पडता पडता बचावले.  हा प्रकार नूतन मराठाचे माजी विद्यार्थी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नूतन मराठा गेट समोर असलेले खड्ड्यांमध्ये वृक्ष ठेवून महापालिकेचा निषेध व्यक्त केला आहे. याप्रसंगी महेश कोळी, प्रदीप कोळी, कुंदन दर्तेकर, ईश्वर चंद्रे, सागर सपकाळे आदी उपस्थित होते. 

Protected Content