जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शिवाजीनगर व परिसरातील रस्त्यांची चाळण झाली असून वारंवार मागणी करून देखील मनपातर्फे डागडुजी करण्यात येत नसल्याने याविरोधात परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
छत्रपती शिवाजी नगर मधील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्स्यात खड्डे आहेत हे कळत नसून मनपा व जिल्हा प्रशासनाकडे दुरुस्तीची वारंवार मागणी केली असता त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत छञपती शिवाजी नगर मित्र मंडळ व रहिवाश्यांनी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला आहे. शिवाजीनगर मधील रस्त्यांची दुरावस्था व शिवाजीनगरचा उड्डाणपूल यासंदर्भात सकाळी १० वाजता क्रांती चौक येथून आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. नागरिकांनी अचानक रास्तारोको आंदोलन केल्याने खेड्यातून जळगाव येथे व्यापार, व्यवसाय, शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झालेत. दरम्यान, या रास्तारोको आंदोलनाने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती. यात विद्यार्थी देखील होते. ही बाब लक्षात घेत बस चालकाने आंदोलकांना बसला जाण्यासाठी मार्ग करून देण्याची मागणी केली. परंतु , आंदोलकांनी त्यांचे काहीएक ऐकून न घेता आपले आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यांचे पूजन करत आज खड्ड्यांचे अंत्यसंस्कार केले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी जोपर्यंत जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आंदोलन स्थळी येवून ठोस आश्वासन देत नाही तोपर्यत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1466461223825056
भाग २
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1058637281712993
भाग 3
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1745466105804009