धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावाजवळ दुचाकीवरील अज्ञात तीन जणांनी रस्त्यावरून जाणाऱ्या दोन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी धक्काबुक्की करत मारहाण करून खिश्यातील मोबाईल वस्तू लांबविल्याची घटना आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द गावाजळील वाघळूद गावाकडे जाणाऱ्या रस्ता आणि नदीच्या पुलावरून विनोद शिवाजी पवार (वय-४१) रा. शिंदखेडा ता. धुळे हे शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री दुचाकीने जात असतांना अज्ञात तीन जणांनी दुचाकीवरून येवून त्यांचा रस्ता आडविला. विनोद पवार यांना धक्काबुक्की व मारहाण करून खिश्यातील मोबाईल आणि ब्ल्युटुथ असा एकुण १४ हजाराचा मुद्देमाल लांबविला तर त्याच रस्त्यावरून रात्री ११ वाजता संदीप सुरेश बोरसे (वय-३२) रा. अमळनेर हे दुचाकीने जात असतांना त्यांना देखील अडवून त्यांच्या खिश्यातील ९ हजार रूपये किंमतीचा मोबाईल घेवून पसार झाले आहे. दोन्ही घटनेतील संशयित आरोपी हे एकच असल्याने पिंप्री खुर्द गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे. याप्रकरणी शनिवारी २६ नोव्हेंबर रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक मोती पवार करीत आहे.