बीड प्रतिनिधी । गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन तसेच उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
रत्नाकर गुट्टे छळतात, मारहाण करतात घटस्फोट मागतात अशी तक्रार सुदामती गुट्टे यांनी केली असून यानुसार रत्नाकर गुट्टेंच्या विरोधात कलम ४९८ अन्वये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर गुट्टे हे गेल्या काही दिवसांपासून सुदामती गुट्टे यांच्याकडे घटस्फोट मागत असल्याचे सांगण्यात आले. सुदामती गुट्टे यांनी यासंदर्भातली रितसर तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यासह एकूण सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदामती गुट्टे यांनी केलेल्या तक्रारीत रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गुट्टे आणि त्यांचा भाऊ तसेच इतर सहकारी मला पिस्तुलाचा धाक दाखवतात असाही आरोप सुदामती यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.