एरंडोल, प्रतिनिधी | गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेची खेळाडू योगेश्वरी मराठे व सागर घिसाडी यांची विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड एरंडोल विभागातून प्रथम क्रमांक पटकविला आहे.
आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत एरंडोल विभागातून ६२ किलो फ्रीस्टाईल महिला वजन गटातुन योगेश्वरी मराठे व ८७ किलो ग्रीको-रोमन वजन गटातुन सागर घिसाडी या दोघा खेळाडूंची निवड झाली आहे. त्यान मार्गदर्शक म्हणून गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष व कुस्ती कोच भानुदास आरखे व अनिल मराठे यांचे मार्गदर्शन लाभले. डी.डी. एस.पी कॉलेजमधून एरंडोल प्रा.के.जी वाघ, प्रा. मनोज पाटील,यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले. त्यांचे अॅड. किशोर काळकर (अनु जाती जमाती मोर्चा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा ), य.च शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अमित पाटील, बालाजी उद्योग समूहाचे संजय काबरा, एमडीबी केमिकल्स समूहाचे पंकज काबरा , महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कार्यकारणी सदस्य सुनील देशमुख, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत महाजन , आनंद दाभाडे , सीनियर कॉलेजचे प्राचार्य एन.ए.पाटील , उपप्राचार्य बडगुजर सर , नगरसेवक बबलू पहेलवान , बाळा पहेलवान, या सर्वांनी अभिनंदन केले. तर गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष पंकज पाटील, कार्याध्यक्ष दुर्गादास वानखेडे, खजिनदार ऋषिकेश महाजन सर्व सदस्य अनिल भोई , अनिल आरखे , नयन आरखे , मनोज उमरे , दिलीप सोनवणे , जावेद खाटीक , दिलीप पाटील फौजी , अनिल अजबसिंग पाटील , संभाजी देसले , राजू साळी , संजय कुंभार , स्वप्निल बोरसे , डी.एस.पाटील, बबलू पहेलवान पोलीस मुंबई , नवल धनगर या सर्वांनी अभिनंदन केले तसेच सर्व संचालक सदस्य सभासद बंधू-भगिनींनी अभिनंदन केले.