लखनऊ वृत्तसंस्था । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे घर बाँबने उडवून देण्याची धमकी पोलिसांच्या हेल्पलाईनवर व्हाटसअॅप मॅसेजच्या माध्यमातून आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. योगींच्या वैयक्तीक सुरक्षेसह घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या ११२ या हेल्पलाइनशी संबंधित व्हॉट्सअॅपवर योगी आदित्यनाथ यांचं घर बॉम्बस्फोट करुन उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या मेसेजमध्ये योगी यांच्या घराबरोबरच इतर पाच ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबरोबर अन्य महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या महिन्यातही योगी आदित्यनाथ यांना धमकी देण्याप्रकरणी मुंबईमधील कामरान आमीन या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर आता बाँब हल्ल्याची धमकी देण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.