मुंबई (वृत्तसंस्था) आर्थिक संकटात आलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ३१ तास चौकशी केल्यानंतर आज पहाटे ४ वाजता त्यांना अटक केली आहे.
शनिवार पासून राणा यांची चौकशी केल्यानंतर दुपारी ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आले होते. त्यानंतर कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना प्रीवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट कोर्ट म्हणजेच, पीएमएलए कोर्टात सादर करण्यात येणार आहे. तसेच राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू यांचीही चौकशी केल्याचे कळते. डीएचएफएल आणि यूपी पॉवर कॉर्पोरेशनला कर्ज देत फायदा मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान, शनिवारी ईडीने दिल्ली आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी छापेही मारले होते.