Home धर्म-समाज युवा परीक्षर्थिनी केला आदर्श गाव पाटोदाचा अभ्यास दौरा

युवा परीक्षर्थिनी केला आदर्श गाव पाटोदाचा अभ्यास दौरा

0
27


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवा परिक्षार्थीचा अभ्यास-दौरा पाटोदा जिल्हा औरंगाबाद या गावी १२ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

 

अभ्यास दौऱ्यानिमित्ताने आदर्श गाव पाटोदा गावाने सर्वच क्षेत्रात साधलेल्या विकासाचा अभ्यास परीक्षार्थीना जवळून करता आला. पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचं एक तासाहून अधिक मार्गदर्शन मिळवता आलं. जुन्या परंपरांना विज्ञानाची जोड म्हणजे नेमकं काय याचं चांगलं उदाहरण या परिक्षा अभ्यास दौऱ्यातुन पहावयास मिळाले.  प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून अपेक्षा काय अशाव्यात  याबाबत  सदोहरण स्पष्टीकरण दिले. तसेच  या व्यतिरिक्त ग्रामीण भागातल्या अत्यंत गंभीर प्रश्नावर त्यांनी चर्चा केली. या विद्यार्थ्यांच्या परिक्षा अभ्यास दौऱ्यात संदीप पाटील रा. डांभुर्णी तालुका यावल यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा यशस्वी झाला.


Protected Content

Play sound